in ,

अमिताभ यांना नात आराध्याने दिल्या शुभेच्छा; एश्वर्याने केला फोटो शेअर

बॉलिवूडचे लोकप्रिय अभिनेते अमिताभ बच्चन यांनी सोमवारी ७९ वा वाढदिवस साजरा केला. या निमित्ताने अमिताभ यांना त्यांच्या चाहते आणि सेलिब्रिटी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी त्यांचा मुलगा अभिषेक बच्चनने त्यांना शुभेच्छा दिल्योच यासोबत त्यांची लाडकी नात आराध्याने देखील त्यांना शुभेच्छा दिल्या आहे.

ऐश्वर्याने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून आराध्या आणि अमिताभ यांचा हा फोटो शेअर केला असून या फोटोत अमिताभ यांनी पांधऱ्या रंगाचा कम्फर्टेबल गाऊन परिधान केला आहे. तर आराध्याने गुलाबी रंगाचा टॉप परिधान केला आहे. हा फोटो शेअर करत ऐश्वर्याने आराध्याकडून अमिताभ यांना शुभेच्छा दिल्या आहेत. “वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजोबा. खूप खूप प्रेम,” अशा आशयाचे कॅप्शन ऐश्वर्याने दिले आहे. हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; चौघे बुडाल्याची भीती

‘परमसुंदरी’ ऋतुजा बागवेने नऊवारी साडीत धरला ठेका