in

लखीमपूर खेरी प्रकरणी काँग्रेस आक्रमक; राष्ट्रपतींना भेटून केली ‘ही’ मागणी!

उत्तर प्रदेश पोलिसांच्या एसआयटीने 3 ऑक्टोबर रोजी लखीमपूर खेरी हिंसाचारासंदर्भात सुमारे 12 तासांच्या चौकशीनंतर आशिष मिश्राला शनिवारी अटक केली आणि मध्यरात्रीनंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले, जेथे त्याला लखीमपूर खेरी जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले.

यासंदर्भात काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी, तसेच प्रियांका गांधी आणि काही शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. यावेळी काँग्रेसकडून राहुल गांधी आणि प्रियांका गांधींनी राष्ट्रपतींकडे थेट केंद्रीय मंत्री अजयकुमार मिश्रा यांना पदावरून हटवण्याची मागणी केली आहे.

राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी राष्ट्रपतींची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राहुल गांधींनी केंद्र सरकारवर परखड शब्दांत टीका केली. “लखीमपूर खेरीमध्ये ज्या शेतकऱ्यांचा मृत्यू झाला, त्यांच्या घरी आम्ही काही दिवसांपूर्वी गेलो होतो. त्यांनी आम्हाला सांगितलं की त्यांना न्याय हवा आहे. ज्यानं ही हत्या केली आहे, त्याला शिक्षा व्हावी. त्यांनी हे देखील सांगितलं की ज्या व्यक्तीने हत्या केली, त्याचे वडील देशाचे गृहमंत्री आहेत. म्हणून जेव्हापर्यंत त्या व्यक्ती मंत्री आहेत, तोपर्यंत योग्य तपास आणि न्याय मिळू शकणार नाही”, असं राहुल गांधी म्हणाले.

“आम्ही राष्ट्रपतींकडे मागणी केली की जोपर्यंत या व्यक्ती मंत्री आहेत, तोपर्यंत न्याय मिळू शकत नाही. त्या मंत्र्यांना हटवण्यात यावं. शिवाय सर्वोच्च न्यायालयाच्या दोन विद्यमान न्यायमूर्तींच्या मार्फत या प्रकरणाची चौकशी केली जावी आणि ज्यांनी हत्या केली, त्यांना शिक्षा मिळायला हवी”, असं राहुल गांधी यावेळी म्हणाले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘किती जाड झालीये’ जेव्हा बॉडी शेमींगचा सामना करावा लागला स्पृहा जोशीला

‘शरद पवार केंद्राची ऑफर न स्वीकारण्याइतके कच्च्या गुरुचे चेले नाहीत’