in

सत्तेच्या लालसेपोटी भाजपाने परमबीर सिंह यांचे पत्रप्रकरण लावून धरले – बाळासाहेब थोरात

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या आरोपांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना क्लीनचिट दिली आहे. यावरून भाजपा पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर काँग्रेस नेते व मंत्री बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांशी संपर्क साधला. याभेटीदरम्यान सत्तेच्या लालसेपोटी भारतीय जनता पक्ष हा मुद्दा उचलून धरत आहे, अशी टीका त्यांनी केली. तसेच या प्रकरणाची योग्य त्या दिशेने चौकशी सुरू असून लवकरच याबाबतीतले सत्य सर्वांसमोर येईल, असेही ते म्हणाले.

परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपात तथ्य नसल्याचे शरद पवारांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्याबद्दल थोरात म्हणाले, शरद पवार यांनी आपली भूमिका दिल्लीतील पत्रकार परिषदेमध्ये मांडली असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आपली भूमिका स्वतःहून मांडतील. तथापि, महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी एकत्रित बसून अद्याप यावर योग्य तो निर्णय घेतलेला नाही. आम्ही लवकरच निर्णय घेऊ, असेही त्यांनी सांगितले.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

…तरच लॉकडाऊनसंदर्भात निर्णय घेऊ- राजेश टोपे

67th National Film Awards | सुशांत सिंह राजपूतच्या ‘छिछोरे’ला ‘सर्वोत्कृष्ट चित्रपटा’चा पुरस्कार