राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कोरोनाग्रस्त असताना काँग्रेस शिष्टमंडळाची भेट घेतल्यावरून वादळ उठले आहे. भाजपाने हा मुद्दा उपस्थित केला होता. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही व्हीसी असल्याचे सांगितले. तथापि, त्या दिवशी अनिल देशमुखांशी ऑनलाइन संवाद साधल्याची पुष्टी काँग्रेसने दिली आहे.
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांनंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपाने लावून धरली आहे. तथापि, या आरोपांमध्ये तथ्य नाही, कारण त्यावेळी गृहमंत्री कोरोनाग्रस्त आणि होमक्वारंटाइन होते, असे सांगत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अनिल देशमुख यांना क्लीनचिट दिली. यावर खुद्द अनिल देशमुख यांनी खुलासा केला आहे. आपल्याला डिस्चार्ज दिल्यानंतर घऱी जात असतान प्रसार माध्यमांशी संवाद साधला होता, असे त्यांनी सांगितले.
शेतकरी आंदोलनासदर्भात काही मान्यवरांनी भाजपाच्या दबावामुळे ट्विट केल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. यासंदर्भात कारवाईची मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने अनिल देशमुखांकडे केली होती. या शिष्टमंडळाने 8 फेब्रुवारीला अनिल देशमुखांना भेट घेतली होती, असा दावाही भाजपाने केला होता. तथापि, आम्ही गृहमंत्र्यांशी ऑनलाइन संपर्क साधला होता, असे काँग्रेसने म्हटले आहे.
Comments
Loading…