in

देश आणि संविधान वाचण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी तळागाळापर्यंत पोहोचावे

75 वर्षात देशाला काँग्रेसने बलशाली केले,मात्र केंद्रा सरकार देश आता विकायला निघाला आहे,त्यामुळे देश धोक्यात आल्याने सत्तेसाठी नव्हे तर देश आणि संविधान वाचवण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी काम केले पाहिजे, असे मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.सांगलीच्या कडेगाव या ठिकाणी आमदार मोहनराव कदम यांच्या लोकसेवा गौरव समारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये ते बोलत होते.

काँग्रेसचे आमदार मोहनराव कदम यांची गेल्या साठ वर्षापासून काँग्रेस पक्षासाठी केलेली सेवा या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा काँग्रेस कडून आमदार कदम यांचा लोकसेवा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता.काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच.के पाटील,गृहराज्यमंत्री सतेज पाटील,कृषी राज्यमंत्री विश्‍वजित कदम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कडेगावच्या वांगी येथील सोनहीरा साखर कारखाना परिसरात हा सोहळा पार पडला.

या प्रसंगी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बोलताना भाजपच्या केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला काँग्रेस पक्षाने पंच्याहत्तर वर्षात देश बलशाली करण्याचं काम केलं.मात्र आता गेल्या काही वर्षांपासून केंद्रातील लोकं देश विकायला निघाले आहेत.त्यामुळे 2024 हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.आज देश आणि संविधान धोक्यात आले आहे. त्यामुळे कॉंग्रेसची सत्ता आली पाहिजे, आणि ही सत्ता देश वाचवण्यासाठी असणार आहे.काँग्रेस कार्यकर्त्यांनी ही तळागाळात जाऊन देश कसा विकायला निघालेले आहेत,याची जाणीव करून दिली पाहिजे,असे मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

murbad thane

कल्याण – चक्कीनाका