in ,

वादग्रस्त पोलीस बदल्या प्रकरण; राज्यातल्या 18 बड्या अधिकाऱ्यांची यादीत नावं

चंद्रशेखर भागे | तत्कालीन गुप्तचर विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी गृहमंत्रालयाला सादर केलेल्या अहवालात महादेव इंगळे याचं बदल्या करणारा दलाल म्हणून नाव होतं.रश्मी शुक्ला यांनी 20 ऑगस्ट 2020 ला अहवाल तयार केला होता 25 ऑगस्टला तत्कालीन पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांना शुक्ला यांनी अहवाल सादर केला होता 26 ऑगस्टला अहवाल तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे पोचला होता.

याच महादेव इंगळेने बदल्या करण्यासंदर्भातची दुसरी यादी होती, ती आता ‘लोकशाही न्यूजच्या हाती लागली असून यात आणखीन चार अप्पर पोलीस महासंचालक आणि दोन पोलीस अधीक्षकसह 9 पोलीस उपाधीक्षक उत्पादन शुल्क विभागाच्या एका अधीक्षकांचा समावेश आहे यामध्ये अप्पर पोलीस महासंचालक संदीप बिष्णोई, विनय कुमार चौबे, संजय वर्मा , बिपिन कुमार सिंग यांच्यासह नगरचे पोलिस मनोज पाटील, मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक मनोज खांडवी या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलीस उपअधीक्षक गणेश बिराजदार, गणेश केंद्रे, विवेक पवार, विकास तोडावाळ, पंकज शिरसाठ, अशोक विरकर, धुळा तोपे, हेमंत सावंत आणि उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक केशव राऊत अधिकारी सीबीआयच्या रडारवर आहेत रडारवर आहेत.

विवो: यापूर्वीच्या 18 नावांमध्ये जी श्रीधर,दिलीप भुजबळ,निसार तांबोळी,विजयकुमार मगर, शिवाजी राठोड ,राकेश कलासागर, दिगंबर प्रधान ,अतुल झेंडे ,संदीप पालवे ,वैशाली कडूकर, पराग मणेरे, मिलिंद मोहिते, अशोक दुबे, राहुल दस, राहुल खाडे, भरत तांगडे ,राहुल श्रीरामे या वरिष्ठ पोलीस अधीक्षक नावे महादेव इंगळे च्या यादीत आली होती.

विवो: दलाल महादेव इंगळे हा उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील तालुक्यातील शेड चा रहिवासी आहे. गेल्या वीस वर्षापासून महादेव हा मुंबईतच राहतो.राज्य पोलीस दलातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करणाऱ्या चार दराला पैकी महादेव इंगळे हा मुख्य दलाल होता महादेव इंगळे हा एका बदलीसाठी 30 ते 40 लाख रुपये घेत होता आडवांस म्हणून तो 50 हजार रुपये द्यायचा असे अहवालात शुक्ला यांनी नमूद केले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसची दिल्लीत सायकल रॅली

दुकाने आणि हॉटेल्स सुरु होतात मग मंदिरे का नाही; श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्टचा सरकारला सवाल