in

Corona | उस्मानाबादकरांसाठी पुन्हा एकदा धोक्याची घंटा; जिल्ह्यात आढळले 100हून अधिक रुग्ण

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना संक्रमित रुग्णांच्या संख्येने शंभरी ओलांडली आहे. जिल्ह्यात बुधवारी १ हजार ९७९ पैकी १०२ जन कोरोना बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील पॉजिटीव्हीटी रेट हा ५ टक्क्यांहून अधिक झाला आहे. जिल्ह्यात गेले काही दिवस दररोज ५० ते ६० रुग्ण सापडत होते

. मात्र बुधवारी हा आकडा अचानक वाढला आहे. जिल्ह्यात दररोज दोन हजार नागरिकांच्या टेस्ट करण्याच्या सूचना दिल्या असून नागरिकांनी देखील कोरोना प्रतिबंधक उपाययोजना व नियमांचे पालन करावे असे आवाहन उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

कोयना धरणातून ४९ हजार क्सुसेक पाण्याचा विसर्ग

आशा भोसले यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर