in ,

कोरोनाचा स्फोट; राज्यात सापडले 25 हजार 681 रुग्ण

राज्य पुन्हा एकदा कोरोनाच्या मगरमिठीत येताना दिसत आहे. कारण दिवसागणिक नवीन रुग्णांचा आकडा मोठा आलेख गाठताना दिसत आहे. आज दिवसभरात तब्बल 25 हजार 681 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्य शासनासह आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. तर आता कोणत्याक्षणी राज्यात संचारबंदी लागू करण्याची भीती नागरिकांना सतावत आहे.

आज दिवसभरात राज्यात 25 हजार 681 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. गुरुवारच्या तुलनेत 152 किंचित रुग्णसंख्या घडली आहे. कारण 25 हजार 833 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आहे होते. दरम्यान आज आढळलेल्या रुग्ण संख्येमुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या आता 24 लाख 22 हजार 021 झाली आहे.

सध्या राज्यात 1 लाख 77 हजार 560 अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. आज 14 हजार 400 रुग्ण कोरोनातून बरे देखील झाले आहेत, राज्यात आजपर्यंत एकूण 21लाख 89 हजार 965 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज 70 रुग्णांचा मृत्यूची नोंद झालेली आहे. आतापर्यंत राज्यात 53 हजार 208 रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे मृत्यूदर 2.20 टक्क्यांवर आला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

World Sleep Day | जाणून घ्या झोपेचे शरीराला होणारे फायदे

Amruta Fadnavis | व्यवहार माझे, जबाबदार वाझे, म्हणतं अमृता फडणवीसांचा हल्लाबोल