in ,

Maharashtra Corona: राज्यात कोरोनाचा विस्फोट; 63 हजार 729 नवे रुग्ण

राज्यावर निर्बध लादून सुद्धा कोरोनाचा उद्रेक सुरूच आहे. आज तब्बल कोरोना रुग्णांचा आकडा 64 हजारानजीक पोहोचला आहे. तर 398 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात आज दिवसभरात 63 हजार 729 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 37 लाख 3 हजार 584 पोहोचली आहे. तर 398 रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्यातीलर मृत्यू दर 1.61टक्के आहे. राज्यात आजपर्यंत 59 हजार 551 रूग्णांचा मृत्यू झालेला आहे.

दरम्यान, आज 45 हजार 335 रूग्ण कोरोनातून बरे देखील झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण 30 लाख 4 हजार 391कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) 81.12 टक्के एवढे झाले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

जळगावात ऑक्सिजन अभावी महिलेचा मृत्यू

संग्रहित छायाचित्र

राज्यात तीन लाख किलो डाळ सडली… शासनाच्या गोदामांचे सत्य उघड