in ,

दिलासादायक ! राज्यात बाधितांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या जास्त

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारीत घट होत चालली आहे, तसेच कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्याही वाढत चालली आहे. त्यामुळे राज्यासाठी हे दिलासादायक बाब आहे.

आजच्या आकडेवारीनुसार राज्यात ३९ हजार ९२३ नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा ५३ लाख ९ हजार २१५ इतका झाला आहे. तर ५३ हजार २४९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. एकूण ४७ लाख ७ हजार ९८० रुग्णांनी करोनावर यशस्वीपणे मात केली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये हे प्रमाण वाढल्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट आता ८८.६८ टक्क्यांवर गेला आहे.यापैकी सध्या राज्यात ५ लाख १९ हजार २५४ अॅक्टिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत.

दरम्यान, राज्याचा रिकव्हरी रेट दिलासा देणारा ठरत असला तरी, राज्यात करोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचा आकडा मात्र अजूनही खूप मोठा आहे. शुक्रवारी दिवसभरात राज्यात ६९५ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू ओढवला आहे. त्यामुळे आत्तापर्यंत राज्यात एकूण मृतांचा आकडा ७९ हजार ५५२ इतका झाला आहे. एकूण मृत्यूदर १.५ टक्के इतका जरी नोंदवला गेला आहे.

What do you think?

-3 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Mucormycosis वर प्रभावी औषधाची वर्ध्यात होणार निर्मिती

हात-पाय बांधून तलवार दिली तर लढायचे कसे ? अशोक चव्हाणांचा सवाल