in

पुण्यात कोरोनाचा हॉटस्पॉट बनत असतानाच कोविड सेंटरची वीज कापली

पुणे एकीकडे पुन्हा कोरोनाचे हॉटस्पॉट बनत चालले असताना दुसरीकडे शहरातील एका जम्बो कोव्हिड रुग्णालयाची वीज जोडणी कापल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे सेंटरमध्ये रुग्णसंख्या वाढत असताना देखील हा प्रकार घडल्याने व कोणतीही पूर्वकल्पना न दिल्याने महापालिका प्रशासनासह सामान्य नागरिकाकडून माहावितरणा विरोधात रोष व्यक्त होत आहे.

गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येचा आलेख वाढत चालला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जम्बो रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला होता. त्यानुसार रुग्णालय पूर्ववतही करण्यात येत होते. मात्र त्याआधीच महापालिका प्रशासनाशी कोणताही संपर्क न करता महावितरणने वीज कनेक्शन कापले.

पुण्यातील जम्बो रुग्णालयाचे जानेवारी महिन्यापासूनचे वीजबिल थकित होते. त्यामुळे आज या रुग्णालयाचे वीज कनेक्शन तोडण्यात आले आहे. मात्र कोणतीही पूर्वसूचना न देता हि कारवाई केल्याने संताप व्यक्त होत आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

बाबा रामदेव यांना पुन्हा दणका : कोरोनावरील उपचार करण्यासाठी कोरोनीलला परवानगीच नाही

Life Insurance | कोरोना लसीमुळे रुग्णालयात दाखल व्हावं लागल्यास खर्च विमा कंपन्या देणार