in

कोरोनामुळे वाढले घटस्फोटाचे प्रमाण

कोरोना विषाणूचा परिणाम संपूर्ण जगावर होत आहे. या विषाणूचा परिणाम जसा लोकांच्या आर्थिक परीस्थितीवर झाला तसाच तो वैयक्तिक आयुष्यावर देखील झाला आहे. कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांच्या घरावर आर्थिक संकट तर उभं केलंच मात्र जीवनसाथी गमावण्याची आणली वेळ आले. एका अहवालानुसार पुणे जिल्ह्यात गेल्या वर्षभरात घटस्फोटाचं प्रकरणं मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. गेल्या अडीच वर्षात साडे तीन हजार जोडप्यांनी घटस्फोटासाठी अर्ज केल्याची माहिती समोर येत आहे. पुणे जिल्ह्यात लॉकडाऊनच्या काळातचं तब्बल 1009 जणांनी कौटुंबिक न्यायालयात रितसर अर्ज करून घटस्फोटही घेतलाय मात्र प्रमाण कुटुंब व्यवस्थेसाठी मात्र चिंताजनक असल्याचे तज्ञाचे मत आहे.

कुटुंबातील कुरबुरी या थेट कौटुंबिक न्यायालयात येऊन पोहोचतात इथं आल्यावर घटस्फोटासाठी आलेल्या जोडप्यांच काऊन्सलिंगही केलं जातं. परंतु बऱ्याच जोडप्यांनी घटस्फोटाचा पर्याय निवडला आहे. घटस्फोटाची जेव्हा कारणं जाणून घेतली तेव्हा नवरा आणि बायकोमधला अहंकार, लॉकडाऊनमुळे जोडीदाराची झालेली पगारकपात, नोकरी गेल्यामुळं आलेलं नैराश्य आणि त्याचा झालेला कुटुंबावरील परिणाम, आणि यातूनचं कुटुंबात झालेली वादावादी. ही कारणं प्रामुख्याने बाहेर आली, असे कौटुंबिक न्यायालय वकील अँड वैशाली चांदणे यांनी सांगितले. कोरोनामुळं आर्थिक संकटाचा सामना हा सर्वानाच करावा लागला आणि सामना करता करता कुटुंबात निर्माण झालेली दूफळी ही घटस्फोटाला कारणीभूत ठरली.

लॉकडाऊनमुळे देशभरात अनेक जणांच्या नोकऱ्या गेल्या आणि यातूनच कुटंबातला वादविवाद मोठ्या प्रमाणावर वाढत गेला, वाढत्या घटस्फोटाचं प्रमाण पाहता लॉकडाऊननं घरावर आर्थिक संकट तर उभं केलंच मात्र निवडलेला जीवनसाथी गमावण्याचीसुद्धा वेळ आणली असंच म्हणावं लागेल, मात्र कुटुंबात हरवत चाललेला संवाद आणि नात्यामधील वाढत्या अपेक्षा कमी करून एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न केला तर घटस्फोटाचं वाढलेले प्रमाण कमी होईल.

असे जरी असले तरी धाकाधुकीच्या आयुष्यात कुटुंबातील संवाद हरवत चाललाय आपण असं म्हणतो पण, मात्र लॉकडाऊननं कुटुंबातील सदस्यांना बराच वेळा मोकळा करून दिला, कुंटुंबातल्या व्यक्तींबरोबर संवाद करता आला. आपल्या माणसांना समजता आले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

भारताचा इंग्लंडवर 66 धावांनी दणदणीत विजय

रश्मी शुक्लांचा अहवाल; पोलीस बदलीचं रॅकेट उघड