in

Maharashtra Corona: चोवीस तासांत ६७,४६८ नवे कोरोनाबाधित, तर ५६८ जणांचा मृत्यू

राज्यभरात पुन्हा संपूर्ण लॉकडाऊन लावण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. राज्यात अद्याप सर्व निर्बंध कडक करण्यात आले आहेत. मात्र, रुग्णांची संख्या कमी होत असल्याचं चित्र नाहीय. राज्यात गेल्या २४ तासांमध्ये राज्यात तब्बल ५६८ मृत्यूंची नोंद झाली आहे.

त्यामुळे राज्यात आजपर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचा आकडा आता ६१ हजार ९११ इतका झाला आहे. तर राज्यातला मृत्यूदर १.५४ टक्के इतका नोंद झाल्याचं आरोग्य विभागाकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीतून स्पष्ट झालं आहे.

गेल्या २४ तासांत राज्यात ६७ हजार ४६८ नवे करोनाबाधित सापडले आहेत. आत्तापर्यंत राज्यात ४० लाख २७ हजार ८२७ नागरिकांना करोनाची लागण झाली असून त्यापैकी सध्या राज्यात ६ लाख ९५ हजार ७४७ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. २४ तासांत राज्यात ५४ हजार ९८५ करोना रुग्ण बरे होऊन घरी देखील गेले आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

CSK vs KKR : चेन्नईचा कोलकातासमोर 220 धावांचा डोंगर

Nashik Oxygen Leak : “वैद्यकीय यंत्रणेचं आव्हान वाढवणारी घटना”