in ,

मुंबईत कोरोनाचा उद्रेक; रुग्णसंख्या 3 हजारावर

राज्यासह मुंबईतही कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढताना दिसतो आहे. आज तब्बत कोरोना रुग्णांचा आकडा 3 हजारावर गेला आहे. त्यामुळे पालिका प्रशासनासह आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे.

मुंबईत आज 3 हजार 62 रुग्ण आढळून आले आहेत. या तुलनेत गेल्या दोन दिवसाचा आकडा 3 हजाराच्या खाली होता. गुरुवारी हा आकडा 2 हजार 877 होता तर बुधवारी हिच आकडेवारी 2 हजार 377 होती. त्यामुळे दिवसागणिक कोरोनाच्या संसर्गासह आकडेवारी वाढताना दिसून येत आहे.

सध्या मुंबईत 20 हजार 140 रुग्ण आहेत. आज 3 हजार 62 रुग्ण आढळल्याने एकूण रुग्णसंख्या आता 3 लाख 55 हजार 897 पोहोचली आहे. तर 1 हजार 334 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता 3 लाख 23 हजार 281 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृतांची संख्या आता 11 हजार 565 झाली आहे. दरम्यान वाढत्या रुग्णसंख्येमुळे मुंबईत कोणत्याही क्षणी संचारबंदीचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अँटिलिया स्फोटक प्रकरण केवळ प्रसिद्धीसाठी?

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंची मागणी