in ,

बेडसाठी वणवण…आणि त्याने रुग्णालयाच्या दारातच सोडला जीव

नगरच्या जिल्हा रुग्णालयातील एक वेदनादयी प्रकार समोर आला आहे. श्रीरामपूरहून आलेल्या अत्यवस्थ रुग्णाला बेड न मिळाल्याने त्याचा दारातच मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली आहे. विशेष म्हणजे मृत्यू होऊन सुद्धा हा रुग्ण जवळपास दोन तास वाहनातच पडून होता.

श्रीरामपूर येथील रुग्ण गंभीर झाल्याने नगरच्या जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. नातेवाईक खासगी वाहनातून रुग्णाला घेऊन आले. मात्र, त्यावेळी जिल्हा रुग्णालयात जागा नव्हती. त्यामुळे त्यांना इतरत्र जाण्याचा सल्ला देण्यात आला. यावेळी नातेवाईकांनी शहरातील बहुतांश हॉस्पिटलमध्ये फिरून पाहणी केली. मात्र कोणत्याच रुग्णालयात बेड शिल्लक नसल्याने रुग्णाला पुन्हा जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, तेथे आणत असतानाच रुग्णाचा मृत्यू झाला.

या घटनेची माहिती नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाला देऊन मृतदेह वाहनातून काढून आत घेण्याची विनंती केली. मात्र, यासाठीही तब्बल दोन तासांचा कालावधी लागला. तोपर्यंत मृतदेह वाहनातच असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. जिल्हा रुग्णालयाचे प्रशासन मात्र, या घटनेवर काहीही बोलायला तयार नाही.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Nitish Rana | आधी कोरोनावर मात आणि मग केली गोलंदाजांची धुलाई

SRH vs KKR Live | राजस्थान रॉयल्सचा गोलंदाजीचा निर्णय