in

ऑक्सिजन सिलेंडर घेऊन कोरोना रुग्णाचे महापालिकेसमोर समोर ठिय्या आंदोलन

राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना नाशिकमधून एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. अनेक रुग्णालय फिरुनही बेड मिळत नसल्याने या कोरोना रुग्णांनी महापालिकेसमोर ठिय्या मांडला आहे. दोन कोरोनाग्रस्त रुग्णांनी नाशिक महापालिकेसमोरच ठिय्या मांडला.

ऑक्सिजन सिलेंडरसह हे दोन्ही रुग्ण महापालिकेसमोर आंदोलनाला बसले. अनेक रुग्णालयात फिरुनही बेड मिळत नसल्यानं या रुग्णांनी ठिय्या आंदोलन केलं. या रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होतोय. अशा स्थितीत या दोन्ही रुग्णांनी महापालिकेसमोरच ठिय्या दिला. त्यामुळे नाशिक महानगरपालिकेकडून कोरोना रुग्णांसाठी होत असलेल्या तोकड्या उपाययोजना चव्हाट्यावर आल्या आहेत.

नाशिक जिल्ह्यातील कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी जनता कर्फ्यूचा निर्णय घेतला गेलाय. जनता कर्फ्यू दरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकानं आणि आस्थापना पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत. किराणा दुकानंही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

ASSAM ELECTION : “हिंदू मुस्लिमांमध्ये फूट पाडण्याचे काम काँग्रेसचे”, अमित शाहांचा हल्लाबोल

Good News | एलपीजी सिलिंडरच्या दरात कपात