in

Mumbai Corona : नालासोपाऱ्यात ऑक्सिजन अभावी १० रुग्णांचा मृत्यू… नातेवाईकांचा आक्रोश

एकीकडे आज राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा घटल्याचे समोर आले आहे. मात्र याच दरम्यान नालासोपाऱ्यात ऑक्सिजन न मिळाल्याने दहा रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केला आहे. यानंतर मृतांच्या नातेवाईकांनी रुग्णालयाबाहेर आक्रोश केला. तसेच रुग्णालयात राडा झाल्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अखेर पोलिसांना पाचारण करण्यात आले आहे.

राज्यभरात कोरोनारुग्णांची परिस्थिती गंभीर होत आहे. नालासोपारा पूर्व या ठिकाणी स्थित विनायक हॉस्पिटलमध्ये 2 तासात 7 जणांचा तर रिद्धीविनायक रुग्णालयात 3 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, रुग्णालय प्रशासनाने हे आरोप फेटाळून लावत रुग्णांची प्रकृती अत्यवस्थ असल्याने मृत्यू झाल्याचा दावा केला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Maharashtra Corona: वीकएन्ड लॉकडाऊन कोरोनामुक्तीच्या पथ्यावर…

‘हे पवार साहेबांचं सरकार हाय, तुमच्या बापाच्यानं पडणार नाय’