in ,

Corona Update | मुंबईत कोरोना रुग्णाचा कहर; एका दिवसात 11 हजारांवर नवे रुग्ण

मुंबईत गेल्या आठवडाभरापासून नवीन कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत चालला आहे. ६ दिवसांपूर्वी मुंबईत दररोज चार हजारांच्या आसपास नवीन रुग्ण आढळत असताना हा आकडा आता ११ हजारांवर जाऊन पोहचला आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत तब्बल ११ हजार १६३ नवीन रुग्णांची नोंद झाली असून हा आकडा पाहून पालिकेची आरोग्य यंत्रणा व प्रशासन हादरलं आहे.

मुंबईत आज ५ हजार २६३ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत तर दिवसभरात २५ रुग्ण उपचारांदरम्यान दगावले आहेत. मुंबईत आतापर्यंत एकूण ४ लाख ५२ हजार ४४५ जणांना करोनाची लागण झाली असून त्यातील ३ लाख ७१ हजार ६२८ रुग्ण बरे झाले आहेत तर ११ हजार ७७६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत करोनाचे ६८ हजार ५२ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी सध्या ४२ दिवस इतका आहे. रिकव्हरी रेट ८२ टक्के तर रुग्णवाढीचा दर १.६१ टक्के इतका आहे.

मुंबई पालिका क्षेत्रात झोपडपट्टी आणि चाळींमध्ये मिळून सध्या ७४ कंटेन्मेंट झोन असून ७०० इमारती सील करण्यात आलेल्या आहेत. एकीकडे करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कठोर पावले टाकली जात असताना चाचण्यांवरही भर देण्यात आला आहे. आज दिवसभरात ४३ हजार ५९७ जणांच्या करोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.

ठाणे जिल्ह्यात ६ हजार ७७ नवे रुग्ण

ठाणे जिल्ह्यात आज ३ हजार १२७ रुग्ण करोनामुक्त झाले असले तरी त्याच्या साधारण दुप्पट ६ हजार ७७ नवीन रुग्ण आढळले. यापैकी ठाणे शहरात १ हजार ७०१, कल्याण डोंबिवली १ हजार ६९३, नवी मुंबई १ हजार ४४१, मिरा-भाईंदर ३४०, उल्हासनगर १५९, भिवंडी १०४, अंबरनाथ २०३, बदलापूर २८६, ठाणे ग्रामीणमध्ये १५० रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे बाधितांचा आकडा वाढत ३ लाख ३८ हजार ७४३ इतका झाला आहे. तर आतापर्यंत २ लाख ९२ हजार ४५१ रुग्ण बरे झाले असून सध्या ३९ हजार ७३१ रुग्ण उपचार घेत आहेत. आज १७ रुग्ण दगावल्याने करोनाबळींची संख्या ६ हजार ५६१ वर गेली आहे.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Maharashtra Corona: कोरोनाचा वाढता कहर कायम… राज्यात ५७ हजार ७४ रुग्णांची वाढ

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मायक्रो लॉकडाऊन आवश्यक