in

राज्यात कोरोनाचा कहर कायम : 27 हजारांहून अधिक रुग्ण, 92 जणांचा मृत्यू

राज्यात कोरोना कहर कायम आहे. सलग तिसऱ्या दिवशी नव्या रुग्णांचा आकडा 25 हजारांवर राहिला. दिवसभरात 27 हजार 126 नव्या रुग्णांचे निदान झाले. तर कोरोनामुळे दिवसभरात 92 रुग्णांचा मृत्यू झाला.
सप्टेंबरमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या 24 हजारांच्या घरात होती. गेले तीन दिवस त्याहून अधिक रुग्ण सापडत आहेत. गुरुवारी (18 मार्च) 25 हजार 833 रुग्ण सापडले. शुक्रवारी (19 मार्च) 25 हजार 681 नवे करोनाबाधित सापडले आहेत. तर, आज थेट 27 हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत.

राज्यात आतापर्यंत 1 कोटी 82 लाख 18 हजार 1 चाचण्या घेण्यात आल्या. त्यापैकी 24 लाख 49 हजार 147 चाचण्यांचे अहवाल (13.44 टक्के) पॉझिटिव्ह आला आहे. तर गेल्या 24 तासांमध्ये 13 हजार 588 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने, कोरोनावर मात केलेल्यांचा एकूण आकडा 22 लाख 3 हजार 553वर पोहोचला आहे. रुग्ण बरे होण्याच दर 89.97 टक्के झाला आहे. राज्यात आज 92 जणांचा मृत्यू झाला असून, राज्यातील मृत्यू दर 2.18 टक्के एवढा आहे. सध्या राज्यात 1 लाख 91 हजार 6 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर, 9 लाख 18 हजार 408 रुग्ण होम क्वारंटाइन आणि 7 हजार 953 संस्थात्मक क्वारंटाइन असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Ind Vs Eng : भारताने उभारला धावांचा डोंगर.. इंग्लंडसमोर २२५ धावांचे आव्हान

हे तर षडयंत्र… अनिल देशमुखांनी विचारले महत्त्वाचे प्रश्न!