in ,

कोरोनाबाधित कैदी रुग्णालयातून फरार

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने सर्व सरकारी यंत्रणा आणि पोलीस यंत्रणेवरील ताण वाढला आहे. अशातच, साताऱ्यात आता पोलिसांच्या डोक्याचा ताप वाढवणारी घटना घडली आहे. याठिकाणी एक कोरोनाबाधित कैदी रुग्णालयातून फरार झाला आहे. माबारक अदिवशी या रुग्णाचे नाव आहे. आता या कैद्याला शोधण्यासाठी पोलिसांची धावाधाव सुरु आहे.

पोलीसांची या प्रकारामुळे चांगलीच नाचक्की झाली आहे. मुबारक याला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. तर त्याला साताऱ्या जिल्हातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तसेच दोन-तीन दिवसांपासून त्याच्यावर उपचार सुरु होते.

मुबारकला कोरोना बाधित असलेल्या रुग्णांच्या वॉर्डमध्ये ठेवण्यात आले होते. यावेळी पोलिसांचा डोळा चुकवून मुबारक रुग्णालयाच्या बाहेर पडला. कोविड रुग्णालयाच्या बाहेर पोलीस बंदोबस्त असूनही कैद्याने पलायन केल्यामुळे पोलिसांवर टीका केली जात आहे

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

कितीही धमक्या दिल्या तरी मागे हटणार नाही: जयश्री पाटील

योगी आदित्यनाथांनी दिली शिवी? , सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय व्हिडीओ