in

Corona Vaccination : स्पुतनिक लसीसाठी मुंबईत जम्बो शीतगृह

रशियातील कोविड प्रतिबंधक स्पुतनिक लसींचा साठा मुंबईला मिळावा, यासाठी मुंबई महापालिकेचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी रेड्डीज लॅबोरेटरी यांच्याशी चर्चा सुरू असून जून अखेरीस थोड्या लसी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या लसी साठविण्यासाठी मुंबईत जम्बो शीतगृह (कोल्ड स्टोरेज) उभारण्यात येणार आहे.

एक कोटी लस खरेदीसाठी मागविलेल्या जागतिक निविदेतील स्पर्धक अपुऱ्या कागदपत्रांअभावी बाद ठरले. त्यामुळे ही निविदा प्रक्रिया रद्द करून स्पुतनिक लसीचे भारतातील वितरक डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज यांच्याकडून लसींचा काही साठा मिळविण्याचे पालिकेचे प्रयत्न सुरू आहेत.

मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात लसींचा साठा करण्यासाठी विशेष शीतगृहाची आवश्यकता आहे. त्यामुळे महापालिकेने स्पुतनिक लसीच्या साठवणुकीसाठी विशेष शीतगृहासाठी जागेची चाचपणी सुरू केली आहे. कांजूरमार्गसारखेच विशेष कोल्ड स्टोरेज उभारण्याचे महापालिकेचे प्रयत्न आहेत. महापालिकेने स्पुतनिक लसीच्याशहर, पश्चिम उपनगर आणि पूर्व उपनगरासाठी सोयीस्कर होईल, अशा जागी स्पुतनिक लसीच्या साठवणुकीसाठी भव्य शीतगृह उभारणार असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पाणी देण्यास नकार देत दलित कुटुंबांला मारहाण

जातवैधता प्रमाणपत्र प्रकरण : खासदार नवनीत राणांना २ लाखांचा दंड