काही दिवसांपूर्वी ६० वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण सुरू करण्यात आलं होतं. यानंतर १ एप्रिल पासून सरकारनं ४५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांचं लसीकरण मोहीम सुरू करणार असल्याची माहिती दिली. लसीकरणासाठी जाणाऱ्या नागरिकांना https://cowin.gov.in या संकेतस्थळावरून किंवा आरोग्य सेतू अॅपवरून रजिस्ट्रेशन करता येणार आहे.
परंतु ज्या लोकांना अपॉईंटमेंट आधी घ्यायची नसेल त्यांना आपल्या नजीकच्या कोरोना लसीकरण केंद्रावर दुपारी ३ वाजता जाऊन रजिस्ट्रेशन करता येणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य सचिवांनी दिली. ऑनसाईट रजिस्ट्रेशनसाठी लोकांना आपल्या सोबत आधार कार्ड किंवा मतदान ओळखपत्र नेता येईल. तसंच पासबूक, पासपोर्ट, रेशन कार्डदेखील ओळखपत्र म्हणून दाखवू शकता, असं केंद्रीय आरोग्य सचिव आर. भूषण यांनी सांगितले.
Comments
Loading…