in

Corona vaccine | मुंबईत आजपासून मोफत लस

मुंबई शहर आणि उपनगरात (आज) सोमवारपासून मोफत लसीकरणावर आणखी भर दिला जाणार आहे. मोफत लसीकरणाचा कार्यक्रम राबविला जात असतानाच लसींचा साठा कमी पडणार नाही; आणि बनावट लसीची प्रकरणे समोर येणार नाहीत यासाठीही महापालिकेने कंबर कसली आहे. मुंबई महापालिकेच्या २४९ केंद्रांवर ३० वर्षांवरील सर्व व्यक्तींना कोविशिल्डचा पहिला, दुसरा डोस मोफत मिळणार आहे. आता ३० वर्षांवरील व्यक्तींनाही लस देण्याबाबत कार्यवाही सुरू झाली आहे.

मुंबई महानगरपालिकेने फेरीवाले, रिक्षाचालक यांसारख्या सुपर स्प्रेडर ठरणाऱ्यांना लसीकरणात प्राधान्य देण्यात येणार आहे. आठवड्यातील तीन दिवस वॉक-इन लसीकरणासाठी राखून ठेवण्यात आले आहेत. सोमवारपासून सुरू होणारा लसीकरणाचा टप्पा हा सर्वात मोठ्या लोकसंख्येचा टप्पा आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

International Yoga Day 2021 |कोरोना काळात ‘योग’ लोकांसाठी आशेचा किरण; नरेंद्र मोदी

InternationalYogaDay | योग करण्याआधी, नंतर काय खायचं काय नाही?