in

Corona Vaccine | “होय, मी चुकलो, माझी भूमिका…” मोदींवरील टीकेनंतर चिदंबरम यांची कबुली

संपूर्ण देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ जून २०२१ नंतर १८ वर्षांवरील सर्वांना मोफत लस मिळण्याबाबत घोषणा केली आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी राज्य सरकारांवर जबाबदार धरल्याबाबत केंद्रावर टीका होताना पाहायला मिळत आहे. यावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींवर टीका करताना चूक झाल्याची कबुली दिली असून, महत्त्वाचा खुलासा केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लसीकरणासंदर्भात मोठी घोषणा केली. १८ वर्षांपुढील सर्व नागरिकांच्या मोफत लसीकरणाची जबाबदारी केंद्र सरकार घेणार आहे. २१ जूनपासून केंद्र सरकार लस उत्पादक कंपन्यांकडून लसीची खरेदी करून राज्यांना पुरवेल. त्यामुळे राज्यांना लसीसाठी कोणताही खर्च करावा लागणार नाही, असे पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान मोदी यांच्या घोषणेनंतर काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी केंद्रावर सरकारवर टीका केली होती.

काय म्हणाले होते पी. चिदंबरम…
पंतप्रधान मोदी राज्य सरकारांना दोष देत आहेत. केंद्र सरकारने लस खरेदी करू नये, असे कुणीही म्हटलेले नाही, असे पी. चिदंबरम यांनी टीका करताना म्हटले होते. राज्य सरकारला थेट लस खरेदी करण्याची परवानगी द्या, अशी मागणी कोणत्या राज्य सरकारने केली होती. याची माहिती एएनआयकडे विचारली होती. माझी चूक झाली. मी माझी भूमिका दुरुस्ती केल आहे, अशी कबुली देत पी. चिदंबरम यांनी यासंदर्भात खुलासा करत स्पष्टीकरण दिले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘उद्धव ठाकरेंना राष्ट्रीय जावई का म्हणू नये?’

शेतकऱ्यांनी कोरोनाच्या दोन्ही लस घेतल्या असतील , तर ‘या’ वर मिळणार २०% सूट