in ,

धम्मचक्र परिवर्तन दिनावर कोरोनाचे सावट

कल्पना नळसकर, नागपुर | डॉ बाबासाहेब आंबेकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूरच्या दीक्षाभूमी वर धम्मचक्र परिवर्तन केलं. त्यामुळे तारखेनुसार आज धम्मचक्र परिवर्तन दिन साजरा केला जातो. दीक्षाभूमी परिसरात मोजक्या लोकांच्या उपस्थित भदंत सुरेई ससाई यांच्या अध्यक्षतेखाली पंचशील ध्वज रोहन करून धम्मचक्र परिवर्तन दिन साजरा करण्यात आला.

दसऱ्याच्या दिवशी मोठ्या संख्येने देशभरातून अनुयायी बाबासाहेबांच्या दर्शनासाठी येतात. तसेच दीक्षाभूमीवर दसऱ्याच्या दिवशी मोठा कार्यक्रम असतो. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धम्मचक्र परिवर्तन सोहळा होणार नसल्याने कुठल्याही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले नाही.दोन डोस घेतले असतील त्यांना फक्त आत मध्ये प्रवेश आहे. सोबतच 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आणि 18 वर्षाखालील लहान मुलांना आत मध्ये प्रवेश देण्याबंधी सगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे.तसेच दीक्षाभूमी परिसरामध्ये पोलिसांचा तगडा बंदोबस्त करण्यात आला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

श्रींच्‍या पुण्‍यतिथी उत्सवाला आज सुरुवात..!!

महिलांच्या सुरक्षेकडे सरकारचं दुर्लक्ष – चित्रा वाघ