in ,

Coronavirus | देशात 24 तासांत आढळले 1,68,912 पॉझिटिव्ह रुग्ण

कोरोना संक्रमणामुळे दिवसेंदिवस रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे. गेल्या २४ तासांत देशातील रुग्णवाढ नव्या शिखरावर पोहोचली आहे. देशात करोनाचा शिरकाव झाल्यापासूनची ही उच्चांकी रुग्णवाढ असून, कोविडमुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्याही २४ तासांत वाढली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गेल्या २४ तासांत झालेली रुग्णवाढ आणि मृत्यूची संख्या जाहीर केली आहे. रविवारी नोंदवण्यात आली रुग्णसंख्या ही आतापर्यंतची सर्वात मोठी रुग्णवाढ ठरली आहे. २४ तासांत १ लाख ६८ हजार ९१२ करोना बाधित आढळून आले असून, याच कालावधीत देशात ९०४ कोविड रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ७५ हजार ८६ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. देशातील एकूण मृतांची संख्याही १ लाख ७० १७९ इतकी झाली असून, एकूण रुग्णसंख्या १,३५,२७,७१७ वर पोहोचली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Weather Report | राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा तडाखा; ‘या’ भागात पावसाचा अंदाज

‘मुंबईतील कोव्हिड सेंटर्सची संख्या वाढवली मात्र काळजी घेणं गरजेचं’