in

Coronavirus | कोरोनामुळे अवघ्या 14 दिवसांच्या बालकाचा मृत्यू

देशभरात कोरोनाच्या रुग्णसंख्येत अत्यंत तेजीनं वाढ दिसून येत असताना हा विषाणू आता लहानग्यांच्या जीवावरही उठल्याचं दिसत आहे. अशी एक घटना सूरतच्या न्यू सिव्हिल रुग्णालयात अवघ्या १४ दिवसांच्या चिमुरड्याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं समोर आले आहे. अवयव निकामी झाल्यामुळे (मल्टीपल ऑर्गन फेल्युअर) बालकाचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी म्हटलंय.

सूरतच्या आणखी एका खासगी रुग्णालयात आणखीन एका १४ दिवसांच्या मुलीला व्हेन्टिलेटरवर ठेवण्यात आलंय. तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचं समजतंय. अहमदाबाद सिव्हिल रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, करोनामुळे होणाऱ्या मृत्युत १५ टक्के मृत्यू तरुण रुग्णांचे होत आहेत.

यावेळी कोरोनाचा बदललेला स्ट्रेन अगोदरपेक्षाही अधिक संक्रामक आहे. लहान मुलांची प्रतिकारक्षमता कमी असते त्यामुळे ते अत्यंत सहजपणे कोरोनाचा शिकार होऊ शकतात. दिल्ली, एनसीआर, हरयाणा, गुजरात, गाझियाबाद या भागांतही अनेक कोरोना संक्रमित लहान मुलं आढळून आली आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

खासदार भावना गवळींचं मोदींना पत्र…

Coronavirus | सलग दुसऱ्या दिवशी १ हजाराहून जास्त रुग्णाचा मृत्यू