in

Coronavirus | ”देशाची अर्थव्यवस्था वाचवायची असेल तर नोटा छापणे गरजेचे”

कोरोना महामारीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होत असल्याचं दिसून येत आहे. गेल्या वर्षभरापासून कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी लॉकडाऊन, कडक निर्बंध असे विविध उपाय केले जात आहेत. मात्र यामुळे देशाची आर्थिक गती मंदावली आहे. देशाची अर्थव्यवस्था वाचवायची असेल तर आता नोटा छापण्याची गरज आहे असं मत भारतीय उद्योग संघटनेचे अध्यक्ष उदय कोटक यांनी व्यक्त केले आहे.

त्याचसोबत कोरोनाच्या संकटकाळात अर्थव्यवस्थेवर परिणाम होत असल्याने बँकानांही त्रास सहन करावा लागत आहे. सरकारच्या पाठिंब्याने कर्जदारांनाही दिलासा देता येऊ शकतो. खासगी बँकांनी गेल्या वर्षभरापासून भांडवल उभे केले आहे. त्यामुळे आधीपेक्षा बँकांची भांडवली परिस्थिती सुधारलेली आहे. भांडवल हे आर्थिक क्षेत्राचं ऑक्सिजन आहे. बँकांनी कर्जदारांच्या रक्कमेचं पूनर्रचना केली पाहिजे. ते झाले तर त्यात सुधारणा होण्याची चांगली क्षमता आहे असं उदय कोटक म्हणाले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘पतंजलि’च्या कारखान्यावर धाड

किरण खेर यांचा कॅन्सरशी लढा; 3 तास चालली बोन सर्जरी