in

पालघरमध्ये नवजात बालकाला कोरोनाची लागण

देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाली असली तरी मृतांचा आकडा मात्र कमी झाला नाही. अशातच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत सर्वाधिक धोका हा लहान मुलांना असल्याचं सांगण्यात येत आहे. परंतु, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही अनेक बालकांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. अशातच पालघरमध्ये अवघ्या पंधरा तासांपूर्वी जन्मलेल्या एक नवजात बालकाला कोरोनाची लागण झाली आहे. सध्या या बाळावर उपचार सुरु आहेत.

पालघर तालुक्यातील दारशेत येथील रहिवासी अश्विनी काटेला असे मातेचे नाव आहे. या मातेची पालघर शहरातील एका खाजगी रुग्णालयात मुदतपूर्व प्रसूती झाली होती. जन्माला आलेले नवजात बाळ वजनाने कमी असल्याने तिला पालघरमधील दुसऱ्या एका रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. तेथे या बाळाची अँटिजन चाचणी सकारात्मक (पॉझिटिव्ह) आली. माता मुदतपूर्व प्रसूत झाल्याने तिच्यावर उपचार सुरु आहेत, अशी त्या खाजगी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी माहिती दिली आहे. मातेची कोरोना अँटिजन चाचणी मात्र नकारात्मक (निगेटिव्ह) आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

भारताच्या आक्षेपातनंतर WHO ने ‘त्या’ व्हेरियंटचे बदलले नाव

Corona update | भारतीयांना दिलासा.. कोरोना रुग्ण संख्येत घट