in ,

coronavirus: देशात पुन्हा लागणार लॉकडाऊन?

कोरोना विषाणूच्या फैलावामुळे महाराष्ट्रात संचारबंदीची घोषणा झाली आहे. तर काही ठिकाणी स्थानिक पातळीवर लॉकडाऊनसारखे निर्बंध लादण्यात आले आहेत. तर दुसरीकडे देशभरात कोरोनाचे दीड लाखांहून अधिक रुग्ण सापडत असल्याने देशपातळीवर लॉकडाऊन होण्याची शक्यता वर्तवली जाऊ लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लॉकडाऊनबाबत सूचक संकेत दिले आहेत.

निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, देशात कोरोनाच्या संसर्गाची दुसरी लाट वेगाने पसरत असली तरी व्यापक पातळीवर लॉकडाऊन लावण्याची केंद्र सरकारची कुठलीही योजना नाही आहे. आम्हाला अर्थव्यवस्था पूर्णपणे ठप्प करायची नाही आहे. त्यामुळे गेल्यावर्षीप्रमाणे आता संपूर्ण देश लॉक होणार नाही. तर कोरोनाच्या साथीला रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर नियंत्रणासाठी विशेष पावले उचलली जातील. कोरोना रुग्णांच्या कुटुंबीयांना वेगळे ठेवण्याबाबत उपाय केले जातील. स्थानिक पातळीवरील उपायांमधून संकटाचा सामना केला जाईल. मात्र लॉकडाऊन लावले जाणार नाही.

अर्थ मंत्रालयाने याबाबत ट्विट करत कोरोना विषाणूच्या साथीला रोखण्यासाठी पाच सुत्री रणनीती तपासणी, माहिती घेणे, उपचार करणे, लसीकरण आणि कोविड-१९ पसरण्यापासून रोखण्यासाठी देशात सुरू असलेल्या माहितीचे विवरण प्रसिद्ध केले आहे. दरम्यान, महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल रात्री आठ वाजता जनतेला संबोधित करताना बुधवारी रात्री आठ वाजल्यापासून १५ दिवसांच्या कठोर निर्बंधांची घोषणा केली होती.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Anil Deshmukh | अनिल देशमुख यांची आज CBI चौकशी; आज होणार निर्णय?

भाजपाच्या ‘या’ आमदारानं घरीच घेतली कोरोना लस