in

CoronaVirus|आधी RT-PCR निगेटिव्ह रिपोर्ट मगच मतमोजणी केंद्रात प्रवेश मिळणार

देशात कोरोनाची परिस्थिती बिकट होत चालली आहे. यातच देशातील पाच विधानसभा निवडणुका पार पडत आहेत. याची मतमोजणी २ मे रोजी होणार आहे. देशातील कोरोनाचा उद्रेक होण्यासाठी निवडणुका जबाबदार असल्याचा आरोप करण्यात येत आहे. मद्रास उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला खडे बोल सुनावले. यानंतर निवडणूक आयोगाने हालचाल करत मतमोजणीच्या संदर्भात नवी नियमावली जाहीर केली. यानंतर आता पुन्हा निवडणूक आयोगाने नवा आदेश काढला आहे.

२ मे रोजी जाहीर होणाऱ्या निवडणूक निकालासंदर्भात निवडणूक आयोगाने आणखी एक नवा आदेश काढला आहे. आता मतमोजणी केंद्रावर येणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल किंवा लसीकरण पूर्ण झाल्याचा रिपोर्ट सादर करणे निवडणूक आयोगाने बंधनकारक केले आहे.

मतमोजणी अधिकाऱ्यांची बैठकव्यवस्था अशी असावी की, दोन अधिकाऱ्यांच्या मधे एक अधिकारी पीपीई कीट घातलेला असेल. त्याचबरोबर जिंकणाऱ्या उमेदवारास दोनपेक्षा जास्त व्यक्तींना सोबत आणायला परवानगी नाही, असे निर्देशही निवडणूक आयोगाने दिले आहेत. यापूर्वीही निवडणूक आयोगाने महत्वाचा निर्णय घेतला असून २ मे रोजी निकालाच्या दिवशी आणि नंतरही विजयी मिरवणुकांवर बंदी आणली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

हृदयद्रावक | दोन दिवस आईच्या मृतदेहाजवळ बसून होता दीड वर्षीय चिमुरडा

सिरमच्या अदर पुनावाला यांना वाय सुरक्षा देणार; गृहमंत्रालयाचे आदेश