in

Coronavirus | सेन्सेक्स- निफ्टीमध्ये मोठी घसरण

देशात कोरोनाची दुसरी लाट आली असून भांडवली बाजार उघडताच झालेल्या चौफेर विक्रीने सेन्सेक्स आणि निफ्टीत मोठी घसरण झाली आहे. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १४०० अंकांनी कोसळला असून निफ्टीत ३५९ अंकांची घसरण झाली आहे. जागतिक बाजारात देखील आज मोठी पडझड दिसून आहे. आज गुंतवणूकदारांनी बँका, वित्त संस्था, ऑटो या क्षेत्रात विक्रीचा मारा सुरु ठेवला आहे.

राज्यात कोणत्याही क्षणी कठोर लाॅकडाउनची घोषणा होण्याची शक्यता आहे तर केंद्र सरकारकडून देखील कठोर निर्बंध लागू केले जातील या भीतीने गुंतवणूकदारांनी बाजारातून पैसे काढण्याचा सपाटा लावला असल्याचे शेअर दलालांनी सांगितले. मात्र आजच्या पडझडीत गुंतवणूकदारांचे किमान तीन लाख कोटींचे नुकसान झाले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

लॉकडाऊनसंदर्भात आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची बैठक

‘भाजपचे मुख्यमंत्री असले की कोरोना पळून जातो का?’