in

अमरावतीत कापूस खरेदीचा श्री गणेशा…

 सुरज दहाट | अमरावती : गणेश चतुर्थी वर्षभरातील शुभ मुहूर्तां पैकी खास मुहूर्त… या शुभ मुहूर्ताला अनेक जण चांगल्या कामाला सुरुवात करतात. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून अमरावतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत खासगी व्यापाऱ्यांकडून गणपतीच्या प्रतिष्ठापनेच्या दिवसाला अर्थात गणेश चतुर्थीला नव्या कापसाच्या खरेदीला सुरुवात करत असतात.

यंदाही अमरावतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत खाजगी व्यापाऱ्यांनी कापूस खरेदीचा श्री गणेशा केला आहे. यावेळी अकोला जिल्ह्यातील अकोट येथील शेतकरी श्री. ढोले यांनी आणलेल्या कापसाला 7111 रुपये प्रति क्विंटल भाव देऊन या शेतकऱ्याचा कापूस खरेदी करण्यात आला आहे. दर वर्षी आम्ही या दिवशी कापूस खरेदीला प्रारंभ करत असल्याच व्यापाऱ्यांनी सांगितले. तसेच यंदा कापसाला चांगला भाव राहणार असून हमी भावापेक्षाही जास्त भाव मिळण्याची शक्यता असल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तवला आहे.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अमरावतीत अल्पवयीन मुलींवर वारंवार अत्याचार; बदनामीच्या भीतीनं मुलीने संपवलं जीवन

Ghatkopar