in

भोसरी जमीन गैरव्यवहार : एकनाथ खडसेंच्या पत्नीला उच्च न्यायालयाचा दिलासा

एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसेंना मुंबई उच्च न्यायालयाने भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणात मोठा दिलासा दिलाय. अटक झाल्यास ५० हजारांच्या जामिनावर सुटका करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तसेच १७ ऑक्टोबर ते २९ नोव्हेंबरपर्यंत प्रत्येक मंगळवार आणि शुक्रवारी ईडीसमोर हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने मंदाकिनी खडसेंना दिला आहे. विशेष न्यायालयासमोर हजर राहण्यासंदर्भातील निर्देश न्यायालयाने या प्रकरणामध्ये मंदाकिनी यांना दिले आहेत.

पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्याविरोधात दोन दिवसांपूर्वीच मुंबई सत्र न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केलं होतं. या प्रकरणी त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, सुनावणीदरम्यान त्यांचा अर्ज फेटाळून लावत त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दिली होती. अंजली दमानिया यांनीच यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, याच प्रकरणामध्ये एकनाथ खडसे यांना मात्र वैद्यकीय कारणांमुळे दिलासा मिळाला असून त्यांच्याबाबत पुढील सुनावणी येत्या २१ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अभिनेत्री नोरा फतेही ईडीच्या रडारवर; चौकशीसाठी कार्यालयात हजर

‘एनसीबीने आर्यन खानला सुपर डुपर स्टार बनवलं’; राम गोपाल वर्मांचं टि्वट