in ,

Bharat Biotech | कोविशिल्डनंतर कोवॅक्सिननेही कमी केले दर

कोविशिल्ड लसीप्रमाणे आता कोवॅक्सिन या भारत बायोटेक कंपनीने लसींचे दरही कमी केले आहेत. कोवॅक्सिन लसीचा दर आता २०० रुपयांनी घटवला आहे. भारत बायोटेकने एक पत्रक प्रसिद्ध करत याबाबत माहिती दिली आहे.

कोवॅक्सिन लसीचा दर आता २०० रुपयांनी घटवला आहे. त्यामुळे राज्य सरकारांना आता कोवॅक्सिन ६०० ऐवजी ४०० रुपये प्रति डोस या किमतीने मिळणार आहे. खासगी रुग्णालयांना मात्र या लसीसाठी पूर्वीचीच किंमत म्हणजे १२०० रुपये प्रति डोस ही किंमत मोजावी लागणार आहे.

भारत बायोटेकने एक पत्रक प्रसिद्ध करत याबाबत माहिती दिली आहे. या पत्रकात भारत बायोटेकने म्हटलं आहे की, सध्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसमोर असलेली आव्हाने लक्षात घेऊन आम्ही आता कोवॅक्सिन ही लस राज्य सरकारांना ४०० रुपये प्रति डोस या किमतीने देणार आहोत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Maharashtra Corona | राज्यात 66 हजार 159 नवे कोरोनाबाधित

गजा मारणेच्या टोळीशी संबंध; १४ जण अटकेत