in ,

Covid 19 | बप्पी लहरी यांना कोरोनाची लागण

महाराष्ट्रात आणि विशेषतः मुंबईमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होताना दिसत आहे. आता ज्येष्ठ संगीतकार बप्पी लहरी यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. उपचारासाठी त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

बप्पी लहरी यांची मुलगी रेमा लहरी बंसल हिनं सांगितलं की बप्पी दा यांनी सतत कोरोना नियमांचं पालन केलं आणि तेवढीच काळजीही घेतली मात्र तरीही त्यांना कोरोनाची लागण झाली.

कोरोनाची काही लक्षणं जाणवल्यानंतर त्यांची तपासणी केली असता रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यांचं वय लक्षात घेता संपूर्ण कुटुंबानं त्यांना डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रेमा लहरी यांनी सांगितलं, की लवकरच ते घरी पुन्हा येतील.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

PPF वरील व्याजदर जैसे थे राहणार – अर्थमंत्री

साईवास्तू : घरात आणि घराच्या आवारात कुठल्या प्रकारची झाडं लावू शकतो?