in

दिलासा : मुंबई, ठाण्यात कोरोना रुग्णसंख्येत घट

मुंबई, ठाण्यात लक्षणीय रुग्णघट नोंदविण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाडय़ातील ग्रामीण भागांत मात्र या विषाणूचा विळखा वाढत आहे. या भागांत बाधितांचे प्रमाणही सुमारे २० ते ३० टक्के आहे. मुंबईत रविवारी करोनाचे १,४३१ रुग्ण आढळले, तर ४९ रुग्णांचा मृत्यू झाला.

दिवसभरात नव्या रुग्णांपेक्षा अधिक म्हणजे १,४७० रुग्ण करोनामुक्त होऊन घरी परतले. ठाणे जिल्ह्यातही नव्या रुग्णांमध्ये घट होत असून, रविवारी ९०७ रुग्ण आढळले. दिवसभरात ५१ रुग्णांचा मृत्यू झाला. १६ ते २२ मेदरम्यान मुंबई, ठाण्यात आधीच्या आठवडय़ाच्या तुलनेत किंचित (अनुक्रमे १.३३ टक्के आणि २.१२ टक्के) रुग्णसंख्या वाढली आहे. मात्र, रुग्णसंख्येतील हा चढ-उतार अत्यल्प आहे.

पुणे महानगरपालिका क्षेत्रात संसर्ग कमी झाला असला तरी पुणे ग्रामीणमध्ये मात्र रुग्णसंख्या ५ टक्क्यांनी वाढली आहे. मृतांची संख्याही या भागात १५ टक्क्यांनी वाढली आहे. सरलेल्या आठवडय़ाच्या आकडेवारीनुसार पश्चिम महाराष्ट्रात गेल्या आठवडय़ाच्या तुलनेत सोलापूर आणि सांगली जिल्ह्य़ातील ग्रामीण भागांत सर्वाधिक म्हणजे १३ टक्के रुग्णवाढ झाली आहे. त्याखालोखाल सातारा (८ टक्के), कोल्हापूर (१० टक्के) रुग्णसंख्या वाढली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘राज्यपाल कोश्यारी मंद गतीचे झालेत; राजभवनात एकदा शांतीयज्ञ करून घ्यावा लागेल’

Tauktae Cyclone | रायगड समुद्रकिनारी दोन दिवसांत आढळले ८ मृतदेह