in ,

कोरोना दीर्घकाळ राहणार; WHO प्रमुखांचं स्पष्टिकरण

संपूर्ण जगभरात पसरलेली कोरोना विषाणुची महासाथ नजीकच्या भविष्यात तरी संपुष्टात येण्याची चिन्हं नाहीत. कोरोना विषाणू दीर्घकाळ भूतलावर वास्तव्य करणार असून लसीकरणाबरोबरच आरोग्याची योग्य ती काळजी घेणं हेचा तूर्तास आपल्या हाती आहे, असं प्रतिपादन जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्य्एचओ) प्रमुख टेड्रोस घेब्रायसेस यांनी केलं आहे.

घेब्रायसेस यांनी पत्रकार परिषदेत यांसदर्भात सविस्तर विवेचन केलं. कोरोनाचं वास्तव्य दीर्घकाळ असणार आहे. बचावासाठी योग्य ती खबरदारी घेणं गरजेचं आहे. जगभरात आतापर्यंत ७८ कोटी लसी दिल्या गेल्या असून अजूनही ही महासाथ आटोक्यात आलेली नाही. नववर्षाच्या प्रारंभी जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यात सलग सहा आठवडे कोरोना फैलावाचा आलेख घसरणीला लागला होता. मात्र, आता सलग सात आठवडे कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्यानं वाढ होत आहे.

अनेक आशियाई तसंच मध्य पूर्वेकडील देशांमध्ये कोरोना झपाट्यानं पसरत आहे. जगभरात लसीकरण मोहिमेनं वेग घेतला असला तरी केवळ लस हाच या महासाथीवरील एकमेव उपाय आहे असं नाही, असंही घेब्रायसेस यांनी म्हटलं आहे.

कोरोनातून बरे झाल्यानंतरही या विषाणूचे दीर्घकालीन परिणाम संभवतात. काही लोकांमध्ये या आजाराविषयी बेफिकीरी दिसून येते. विशेष म्हणजे तरुणांमध्ये हा आजार आपल्याला होणारच नाही, असा भ्रम आहे. त्यामुळे हा भ्रम दूर करण्याबरोबरच काळजी घेणं महत्त्वाचं आहे, असंही घेब्रायसेस म्हणाले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Uddhav Thackeray PKG : “पॅकेजमध्ये बहुतांश घटकांचा विचारच नाही” – फडणवीस

Maharashtra Lockdown | “ब्रेक द चेन नव्हे तर चेक द ब्रेन”