राज्यात आता नव्या दरांनुसार करोना चाचणीसाठी ५०० रुपये आकारले जाणार आहेत. याआधी ज्या चाचणीसाठी ७०० रुपये दर आकारले जात होते, ती चाचणी आता फक्त ५०० रुपयांमध्ये करता येणार आहे.
सर्व खासगी प्रयोगशाळांना करोना चाचणीचे हे दर लागू असतील. यासोबतच रॅपिड अँटिजेन टेस्टच्या दरांमध्ये देखील कपात करण्यात आली असून आता ही चाचणी फक्त १५० रुपयांमध्ये करता येणार आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही घोषणा केली आहे.
राज्य शासनाने सप्टेंबर, ऑक्टोबर आणि डिसेंबर या महिन्यांमध्ये कोरोना चाचण्यांच्या दरांमध्ये सुधारणा करीत अनुक्रमे आधी १२००, मग ९८० आणि शेवटी ७०० रुपये असे दर करण्यात आले होते.
सीएलआयए फॉर सार्स कोविड अँटीबॉडीज या चाचणीसाठी अनुक्रमे प्रत्येक टप्प्यानुसार ३५०, ४५० आणि ५५० असे दर निश्चित करण्यात आले आहेत. तर रॅपीड अँटीजेन टेस्टसाठी प्रत्येक टप्प्यानुसार १५०, २०० आणि ३०० असे दर आता निश्चित करण्यात आले आहेत.
Comments
Loading…