in

मालेगावात केवळ १० टक्के लसीकरण ; लसीकरणात सावळा गोंधळ!

लसीची मात्रा न देताच केली शासकीय दप्तरी नोंदणी

संदीप जेजूरकर
लसीकरणाची जबाबदारी सोपविण्यात आलेल्या मालेगाव मनपाच्या शिक्षकांनी लसीकरणाची मात्रा न देताच संबंधितांची नोंदणी केल्याचे आता उघड झाले आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर मनपा प्रशासनाने १० शिक्षकांचे निलंबन केले आहे.

लसीकरणाचा वेग वाढविण्याच्या दृष्टीने मनपा प्रशासनाने शिक्षकांवर लसीकरणाची जबाबदारी सोपवली होती. मात्र, या शिक्षकांनी जनजागृती करणे सोडाच, चक्क लसीकरणाची मात्रा न देताच त्यांना मात्रा दिल्याबाबतची नोंद सरकार दप्तरी करत त्यांना प्रमाणपत्रही दिले. लसीच्या व्हायल शिल्लक राहिल्याने ही बाब वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या लक्षात आली. केलेली नोंदणी आणि प्रत्यक्षात लसीकरणावेळी शिल्लक राहिलेली व्हायल मॅच न झाल्याने ही धक्कादायक बाब उघडकीस आली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

साईसंस्थानचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांना हायकोर्टाची नोटीस!

Petrol-Diesel Rate | जाणून घ्या आजचे पेट्रोल डिझेलचे दर