आज वर्षभरानंतरही भारतात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढतच जात आहे. एकीकडे मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यात येत आहे तर दुसरीकडे कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. दरम्यान, कोरोना लसीबाबत केंद्र सरकारकडून नवीन गाइडलाइन्स जाहीर करण्यात आल्या आहेत. यानुसार, सोमवारी २२ मार्चल कोविशील्ड संदर्भात केंद्र सरकारकडून सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना एक महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आली आहे. या सूचनेनुसार, केंद्र सरकारने कोविशील्ड लसीचा दुसरा डोस आता एक नाही तर दोन महिन्यात मिळणार आहे. यानुसार या लसीच्या दोन डोसमध्ये आता ४ च्या ऐवजी ६ ते ८ आठवड्याचं अंतर असणार आहे.
कोविशील्डचा दुसरा डोस ४ ते ६ आठवड्यांत देण्यात येत होता. परंतु सरकारच्या नव्या गाइडलाइन्स नुसार कोविशील्डच्या पहिल्या आणि दुसर्या डोसमधील अंतर वाढवण्यात आले आहे. हे अंतर आता ६ ते ८ आठवड्यांपर्यंत कमी करण्यात आले आहे. लसीबाबत राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार आणि लसीवरील राष्ट्रीय तज्ज्ञ समुहाच्या सल्ल्यानंतर हा निर्देश घेण्यात आला आहे. हा निर्देश केवळ कोविशील्डसाठी घेण्यात आला आहे. हा निर्देश कोव्हॅक्सिन या लसीसाठी लागू होणार नसल्याचेही केंद्राकडून सांगण्यात आले आहे.
सध्या देशात सुरू असलेल्या कोरोना लसीकरण मोहीमेत २ प्रकारच्या कोरोना लसी नागरिकांना दिल्या जात आहे. यामध्ये भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन तर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची कोविशील्ड या लसींचा वापर केला जात आहे. केंद्र सरकारचे नवे निर्देश हे केवळ कोविशील्ड या कोरोना लसीकरता लागू असणार आहे तर कोव्हॅक्सिनवर हे निर्देश लागू नसतील.
Comments
Loading…