in

परमबीर सिंहांच्या अडचणीत वाढ; संजय पूनमिया विरोधात सिन्नरमध्ये गुन्हा दाखल

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. बनावट दाखले देऊन जमिनीची खरेदी करणाऱ्या संजय मिश्रीमल पूनमिया विरोधात सिन्नरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय परमबीर सिंहांसाठी व्यवहार करत असल्याचा संशय आहे.

सिन्नर येथील मौजे धरणगाव येथे चेतन मिळकत खरेदी करून संबंधित शेतकरी आणि शासनाची फसवणूक केल्याचे प्रकरण राज्य गुप्तचर विभागाकडे केलेल्या एका तक्रार आल्यानंतर समोर आले. गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांना हा तक्रार अर्ज आल्यानंतर त्यांनी सोमवारी नाशिक येथे सिन्नर येथील दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन याबाबत कागदपत्रांची तपासणी केली त्याच्यामध्ये मुंबई येथे राहणारे संजय मिस्त्री मन पूनमिया यांनी सिन्नर ते मौजे धरणगाव येथे शेतकरी असल्याचा खोटा दाखला देऊन शासनाची फसवणूक केल्याचे समोर आले.
त्यामुळे सिन्नर येथील दुय्यम निबंधकांनी सिन्नर पोलीस ठाण्यांमध्ये दिलेल्या तक्रारीवरून संजय मिश्रीमल पूनमिया यांच्याविरुद्ध भादवि 420 456 468 471 तसेच नोंदणी अधिनियम 1908 चे कलम82 नुसार गुन्हा फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. यापूर्वी संजय मिश्रीमल पूनमिया त्याच्याविरुद्ध ठाणे नगर पोलिस ठाणे मध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 151 /2021 भादवि 166 209 210 384 385 या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यांमध्ये त्याला अटक करण्यात आली आहे.

संजय मिश्रीमल पुनमिया ही व्यक्ती महाराष्ट्र पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्यासाठी काम करत असल्याचा संशय आहे. परमवीर सिंग यांच्यासाठी जमिनीचा व्यवहार करत असल्याचीही माहिती आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

गोंदीयात एसटीच्या ८२ फेऱ्या वाढविल्या

Tuljabhavani temple | वशिलेबाजी व सो कॉल्ड व्हीआयपींना लगाम; मंदीर संस्थानकडून नियमावली जाहीर