in

राज्याला कोळसा न देण्याचा केंद्र सरकारचा डाव; काँग्रेसचा आरोप

राज्यातील 19 वीज निर्मिती करणारे संच बंद पडले आहेत. ज्या राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार नाही. त्या राज्यांना जाणून-बुजून कोळसा पुरवला जात नाही. नैसर्गिक आपत्ती किंवा पाऊस असल्याचे सांगून कोळसा देण्याचे टाळलं जात आहे. मात्र केंद्राचे ऊर्जामंत्री वीज टंचाई नसल्याचे सांगतात. राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी अनेकदा केंद्रीय ऊर्जा मंत्री यांना तसेच संबंधित अधिकाऱ्यांना दिल्लीत भेटून देखील राज्याला मदत केली जात नाही. महाराष्ट्रातील सामान्य जनतेला त्रास देण्यासाठी भारतीय जनता पक्षाने ही भूमिका स्वीकारली असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

सर्वात जास्त तुटवडा हा चंद्रपूर कोराडी खापेरखेडा परळी, पारस आणि नाशिक येथील वीज संचामध्ये आहे. कोपर्डी येथे 2400 मेगावॅट, चंद्रपूरमध्ये 2920 मेगावॅट, खापरखेडामध्ये 1340 मेगावॅट, परळीमध्ये 750 मेगावॅट, पारसमध्ये 500 मेगावॅट, नाशिकमध्ये 630 मेगावॅट, तर भुसावळमध्ये बाराशे दहा मेगावॅट एवढी वीज निर्मिती होते. मात्र सध्याची या सर्व वीज निर्मिती संच याची कोळशाची परिस्थिती पाहिली तर जवळपास एक ते दीड दिवस पुरेल एवढाच कोळशाचासाठा वीज निर्मिती संचाकडे आहे. त्यामुळेच राज्यावर वीजनिर्मितीचा संकट येण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पुण्यातील पर्यटनस्थळं आजपासून खुली; लोणावळ्यात पर्यटकांची हजेरी

फळ बागायतदार शेतकरी संकटात; अतिवृष्टीने सव्वा एकर पपई बाग तोडली