in

कोरोना काळात राज्यापुढे रक्त तुटवड्याचे संकट

राज्यात कोरोनाचे संकट असतानाच दुसरीकडे महाराष्ट्रात मुंबईसह राज्यात पुढील 5 ते 6 दिवस पुरेल एवढाचा रक्ताचा साठा (Blood) शिल्लक असल्याची आता माहिती मिळत आहे. अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे. यासोबतच त्यांनी नागरिकांना रक्तदानासाठी पुढे येण्याचं आवाहनही देखील केलं आहे.

राजेंद्र शिंगणे यांनी मुंबईसह राज्यातील रक्तसाठ्याचा आढावा घेतला. त्यानंतर याबाबत माहिती दिली आहे. “मुंबईसह राज्यात पुढील 5 ते 6 दिवस पुरेल एवढा तर जास्तीत जास्त दहा दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा शिल्लक आहे. त्यामुळे महत्त्वाच्या शस्त्रक्रियांवेळी रुग्णांना रक्ताची अडचण येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी रक्तदान करावं. रुग्णालये आणि विविध सामाजिक संघटनांनीही पुढाकार घेत रक्तदान शिबिरे आयोजित करावीत” असं आवाहन शिंगणे यांनी केलं आहे. अशी माहिती त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Samsung Galaxy S20 FE 5G स्मार्टफोन लाँच

बारावीच्या विद्यार्थ्यांना ‘या’ दिवसापासून मिळणार ‘हॉलतिकीट’