in

राज्यात अवकाळी पाऊस; बळीराजा संकटात

राज्यात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. शेतकरी बांधवांवर पुन्हा एकदा अस्मानी संकट ओढावलं आहे.

सातारा, पुणे, नाशिक, जळगाव, अहमदनगरसह राज्याच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. यामुळे काढणीला आलेल्या गहू, ज्वारी, कांदा, भुईमूग, द्राक्षे, आंबा तसंच फळबागांचं मोठं नुकसान झालं. यामुळं शेतीच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

पुण्यात वेल्हे तालुक्याला वादळी वाऱ्यासह गारांच्या मुसळधार पावसाने झोडपून काढले. तालुक्यातील किल्ले राजगड, तोरणा परिसरात पावसाचा जोर अधिक होता. पावसामुळे वीटभट्टी व्यावसायिकांचेही मोठे नुकसान झाले. नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात दुपारी अचानक वादळी वाऱ्यासह गारपीट झाली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

भाजपा आमदार आशिष शेलार कोरोना पॉझिटिव्ह

‘मोदी सरकारच्या काळात माध्यमांची मुस्कटदाबी’