in

Cruise Drug Case : आर्यन खानच्या अर्जावर आज सुनावणी

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या (Aryan Khan) जामीन अर्जावर आज (13 ऑक्टोबर) सुनावणी होणार आहे. त्यामुळे आर्यन खानचा कोठडीतील मुक्काम वाढणार की जामीन मिळणार, हे आज स्पष्ट होणार आहे. कॉर्डिलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणात ३ ऑक्टोबरपासून आर्यन खान अटकेत आहे.

जामिनासाठी आर्यनने सत्र न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, एनसीबीने उत्तर दाखल करण्यासाठी मुदत मागितल्याने मुंबई सत्र न्यायालयाने आज बुधवारी सुनावणी ठेवली आहे. किल्ला कोर्टाने केवळ सुनावणीच्या अधिकारक्षेत्राच्या मुद्द्यावर आर्यनचा जामीन अर्ज फेटाळला होता, त्यानंतर आरोपी आर्यन खानबरोबरच अरबाज मर्चंट, मुनमून धमेचा, नुपूर सतिजा आणि मोहक जयस्वाल यांच्यातर्फे जामीन अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

प्रकरण काय?

मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या क्रूझवर हायप्रोफाईल ड्रग्ज पार्टीवर एनसीबीने शनिवारी रात्रीच्या सुमारास कारवाई केली. यात १३ ग्रॅम कोकेन, ५ ग्रॅम एमडी (मेफोड्रोन), २१ ग्रॅम चरस आणि २२ एक्स्टसीच्या गोळ्या आणि १.३३ लाख रुपये रोख जप्त करण्यात आले होते. या प्रकरणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान त्याचा मित्र अरबाज मर्चंट, मुनमुन धामेचा, नुपूर सारिका, इस्मीत सिंग, मोहक जसवाल, विक्रांत छोकर आणि गोमित चोप्रा या आठ जणांना अटक केली होती.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

कुर्ला येथे इमारतीच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या २० दुचाकी जळून खाक

“देशात किसानही सुरक्षित नाहीत आणि जवानही”