in

कसारा घाटात जीवमुठीत घेऊन करावा लागतोय प्रवास

मुंबई-नाशिक महामार्गावरून कसारा घाटात प्रवास करताना निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे तुटलेले संरक्षण कठडे, डोकावणाऱ्या दरडी, तुटलेला रस्ता, पडलेले खड्डे, यामुळे रोज इथे अपघात होतात, संपूर्ण कसारा घाटातील ७ किलोमीटर चा प्रवास जीव मुठीत धरून करावा लागत आहे.

कसारा घाटात पावसाळ्यापूर्वी ना कोणत्याच प्रकारची नालेसफाई झाली, ना तुटलेले संरक्षण कठडे दुरुस्त करण्यात आले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व त्यांनी नेमलेले ठेकेदार कंपनी अनेकदा दुरुस्तीच्या नावाखाली थातुर-मातुर कामं करून बिलं काढण्याचे काम करतात. या मार्गावरून नियमित प्रवास करणाऱ्यांना नागमोडी वळणे, कमकुवत संरक्षण कठडे यांचा अंदाज न आल्याने अनेक अपघात घडतात. शिवाय जुन्या कसारा घाटाच्या खालून रेल्वे मार्ग जात असल्याने अनेक मालवाहतूक ट्रक दरीत गेल्याने रेल्वे ट्रक पर्यंत जातात यामुळे मोठा अपघात ही होऊ शकतो, तसेच महामार्ग बनवताना सुरुंगाच्या स्फोटाने कमकवूत झालेल्या डोकावणाऱ्या दरडी, यामुळे पावसाळ्यात दर वर्षी महामार्गावर दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढत आहे.

याबाबत दिल्ली रिसर्च सेंटरने महामार्ग प्राधिकरणाला पत्र व्यवहार करून या दरडीना संरक्षण जाळी लावण्याच्या सूचना देखील दिल्या असून याकडे पहायला ना महामार्ग प्रशासनाला वेळ आहे, ना रस्त्याच्या दुरुस्तीचा ठेका घेतलेल्या ठेकेदार कंपनीला. यांच्या निष्काळजीपणामुळे नाहक प्रवाशांचा जीव जात आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

दोषी आढळलेल्या ठाणेदार सतीश पाटील यांची तडकाफडकी उचलबांगडी

Vat Purnima 2021 Puja : वटपौर्णिमा कशी साजरी करावी? जाणून घ्या या उत्सवाबाबत सर्वकाही