in

कसारा घाटात दरड कोसळली, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

इगतपुरीत मुसळधार पाऊस कोसळत असल्याने मध्य रेल्वेच्या वाहतुकीचे तीन तेरा वाजले आहे. मुंबईतून बाहेर गावी जाणाऱ्या आणि मुंबईकडे येणाऱ्या लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या अडकून पडलेल्या आहेत. याशिवाय अमरावती एक्स्प्रेस खर्डी ते इगतपुरी स्थानकादरम्यान अडकल्याची माहिती समोर येत आहे. याशिवाय उंबरमाळी येथे रेल्वे ट्रॅकमध्ये पाणी भरल्याने अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.

मुंबई-आग्रा महामार्गावर जव्हार फाट्याजवळ दरड कोसळ्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे नाशिकच्या दिशेला जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. या घटनेचा रेल्वे वाहतुकीवरही फरक पडला आहे. नाशिकच्या दिशेला जाणारी रेल्वे वाहतूकही ठप्प झाली आहे. तसेच कसाराच्या अलिकडील रेल्वे स्थानकांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचण्याच्या घटना समोर आल्या आहेत.

कल्याण ते कर्जत आणि कल्याण ते कसारा उपनगरील लोकल सेवेला फटका

मध्य रेल्वेने १ वाजून १६ मिनिटांनी पावसाबाबत शेवटचे अपडेट्स दिले आहेत. त्यानुसार कल्याण ते कर्जत आणि कल्याण ते कसारा या उपनगरील लोकल सेवेच्या दोन्ही मार्गांना फटका बसला आहे. या भागात मुसळधार पाऊस कोसळत असून त्याचा परिणाम वाहतुकीवर झाला आहे. कसारा भागात अवघ्यात ४ तासांत १३९ मिलीमीटर इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली असून अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. उंबरमाळी स्टेशनवर प्लॅटफॉर्मवरून पाणी वाहत असल्याचे भीषण छायाचित्र हाती आले आहे. कसारा येथेही ट्रॅकवर पाणी भरले आहे. कसारा घाट येथे मोठा दगड ट्रॅकवर कोसळल्याचेही सांगण्यात येत आहे. या स्थितीत बुधवारी रात्री १०.१५ वाजल्यापासून इगतपुरी ते खर्डी दरम्यानची वाहतूक थांबवण्यात आली आहे. याचा फटका लांब पल्ल्याच्या गाड्यांनाही बसणार असून त्याबाबतची माहिती नंतर देण्यात येईल, असे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.

बदलापूर भागातही पावसाचा जोर वाढला असून अंबरनाथ आणि बदलापूर दरम्यान ट्रॅकवर मोठ्या प्रमाणात पाणी भरले आहे. त्यामुळे रात्री १२.२० वाजतापासून वांगणी ते अंबरनाथ दरम्यानची वाहतूक थांबवण्यात आली, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले आहे. दरम्यान, ठाणे जिल्ह्यातील धरण क्षेत्रात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असल्याने मुंबई महापालिकेची तानसा आणि मोडकसागर ही दोन्ही धरणं ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे यंत्रणा सतर्क झाल्या असून धरणक्षेत्रात आवश्यक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

जुन्या कसारा घाटात दरड कोसळली; महामार्गावरील वाहतूक विस्कळीत

कसारा घाटात दरड कोसळली, या ट्रेन्स रद्द