राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नवे सरकार्यवाह म्हणून दत्तात्रय होसबळे यांची निवड करण्यात आली आहे. बंगळुरू येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा सुरू असून त्यात होसबळे यांचे नाव सरकार्यवाह म्हणून निश्चित करण्यात आले. भैयाजी जोशी यांच्याकडे हे पद होते. होसबळे यांच्या निवडीमुळे आता भैयाजी जोशी यांच्याकडे कोणती जबाबदारी दिली जाते, याकडे लक्ष लागले आहे.
दरवर्षी नागपूर येथे संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा होते. मात्र यंदा कोरोनाच्या प्रादुर्भाव असल्याने ती बंगळुरू येथे आयोजित करण्यात आली आहे. संघामध्ये सरसंघचालकानंतर सरकार्यवाह हे पद मानले जाते. होसबळे हे सहसरकार्यवाह होते. 2024मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुका आणि त्यापाठोपाठ 2025मधील संघाचे शताब्दी वर्ष असल्याने होसबळे यांची सरकार्यवाहपदी करण्यात आलेली निवड महत्त्वपूर्ण ठरली आहे. तसेच शताब्दी वर्ष ध्यानी घेता भैयाजी जोशी यांच्याकडे एखादी विशेष जबाबदारी सोपविली जाण्याची शक्यता आहे.
Comments
Loading…