in

‘प्रिय भक्तांनो’… प्रकाश राज यांचा मोदी समर्थकांना टोला

बॉलिवूड अभिनेता प्रकाश राज मोदी सरकारवर नेहमीच निशाणा साधत असतात. त्यामुळे अनेक वेळा मोदी सर्मथकांकडून त्यांना चांगलेच ट्रोल करण्यात येते. सोशल साईटवर मात्र ते ट्रोल करणाऱ्या मोदी समर्थकांकडे दुर्लक्ष करीत मोदींविरुद्ध आवाज उठवत राहतात. ‘प्रिय भक्तांनो, मी त्यांनाच प्रश्न विचारत आहे, जे आज सत्तेत आहेत. मी सत्ते नाही… असे ट्विट राज यांनी केल.’

नक्की काय आहे प्रकरण
गेल्या काळात गाझियाबादमधील एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कारप्रकरणी अनेक सोशलवर मीडिया युजर्सने ट्विट केलं आहे. कठुआ मंदिरातील गँगरेप आणि गाझियाबाद येथील मशिदीतील बलात्कार या दोन्ही समान घटना आहेत. अशी चर्चाही सोशलवर सुरु आहे. या घटनेतील आरोपीना शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी सोशलवर केली जात आहे. मात्र काही युजर्स आरोपीच्या समर्थनार्थ असून ते मोर्चे काढत आहे. या समर्थकांना अभिनेत्री स्वरा भास्कर हिने JustAsking हा हॅशटॅगही वापरत भारत माती की जय म्हणणारे त्यांविरुद्ध का बोलत नाहीत, असा सवाल केला. यावर आता तिच्या ट्विटला रिट्विट करत प्रकाश राज तिला पाठिंबा दर्शवला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

10th Exam | दहावीची परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाविरोधातील याचिका मागे

प्रसिद्ध मराठी गायिका वैशाली माडेचा राष्ट्रवादीत प्रवेश